Marathi jokes : नमस्कार मित्रांनो, विनोद म्हणजे माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे. marathi jokes करून एखाद्याला खळखळून हसवण हे प्रत्येकालाच जमत नाही.तर असेच काही marathi jokes इथे तुम्हाला पहायला मिळतील. मित्र – मैत्रीण म्हटल कि marathi jokes for friends तर येणारच…त्यांच्या मध्ये होणारे पांचट marathi jokes for friends ऐकून खूप हसू येत. असेच काही Marathi jokes इथे दिलेत आहेत ते नक्की वाचा आणि खूप हसा…..तसेच तुम्ही Marathi jokes download देखील करू शकता.
1.) मी माझ्या भविष्याचा खूप खोलवर विचार करत असतो….
मोबाईल चार्जिंग ला लावलेला असेपर्यंत….
2.) प्राध्यापक: ताजमहल कोणी बनवला ??
विदर्भाचं पोट्ट : काऊन ? बराबर नाई जमला का?
3.) नवीन पुणेरी पाटी: तुमचं तोंड कितीही वंगाळ असू द्या,
तुमचा छान सुंदर अट्रॅक्टिव्ह डीपी बनवून मिळेल.
4.) रोज ५ किमी सरळ चालल्याने… फक्त तीन महिन्यांनंतर, तुम्ही, अंदाजे, घरापासून ४५० किमी दूर जाल. त्यामुळे रोज फक्त २.५ किमी चला, आणि २.५ किमी वापस या.
5.) डॉक्टर : सांग, तुला न्यूमोनियाचा त्रास पूर्वी कधी झाला होता का ? पेशंट : हो, एकदाच. डॉक्टर: कधी? पेशंट : सरांनी त्याचे स्पेलिंग विचारले होते, तेव्हा.

6.) Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला . एक डॉक्टर म्हणाले ” याला काय झालं असेल हो ? ” डॉक्टर १ :left knee arthritis .” डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis “. डॉक्टर ३ :” काहीतरीच काय !Ankle sprain असणार .” डॉक्टर ४ : अरे बाबानो जरा नीट पहा ,त्याला एक पाय नीट उचलता येत नाही . foot drop असणार त्याचे lower motor neurons बिघडले असणार .” डॉक्टर ५ : मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय . डॉक्टर ६………….काही बोलणार…. तोपर्यंत तो इसम जवळ आला आणी अत्यंत नम्रतेने विचारू लागला , . . . . इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणानी पाय भरलाय*?????
7.) एक प्रश्नाने मला रात्रभर झोप नाही लागली …. छोटी abcd मोठ्या ABCD पेक्षा किती वर्षाने लहान आहे ?
8.) एका वस्तू वर 20 टक्के डिस्काउंट असेल तर पाच वस्तू घेतल्या की 100 टक्के डिस्काउंट मिळेल का? कसं असतंय ते..लग्नपत्रिकेमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते ” कृपया दारू पिणाऱ्यांनी येवू नये ” नवरदेवच आला नाही??
9.) शिक्षक: भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे ? गणू: भावना…! शिक्षक: कशी? गणू: कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात… शिक्षकांना पण भावना अनावर झाल्या..
10.) नवरा – बापटांच्या नवीन सूनबाईंचं नाव काय ठेवलं ? बायको – श्यामला. सावळी आहे ना नवरा – मग गोरी असती तर काय गोरीला ठेवलं असतं?
11.) पुणेकर : काका पावशेर रताळे द्या दुकानदार : पिशवीत देऊ? पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात
12.) पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय??
13.) भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी : हा आहे साहेब पुणेकर : आधी ते खर्च कर
14.) एकदा शिक्षकांनी फळ्यावर एक गणित लिहिले 36x + yx-2/3yx + 3x (66y + 12x)b =0 गण्या वरील गणित सोडव गण्या फळ्याकडे गेला duster घेतले आणि फळा पुसून काढला…. “Problem solved! कधी कधी जीवनाचे प्रॉब्लेम अशा पद्धतीने सुद्धा सोडवायचे असतात…

15.) जय हो मुलगा : महाराज माझं भविष्य सांगता का जरा….? ज्योतिष : तुझ्या कुंडली मध्ये भरपूर पैसे आहेत मुला मुलगा : महाराज ते कुंडलीत लिहिलेले पैसे अकाउंट वर ट्रान्सफर कसे मारायचे हे तर सांगा ना ?? ज्योतिषी पुन्हा त्या एरियामध्ये कधी दिसला नाही ….
16.) सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते. शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले. मुख्याध्यापक : काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात, मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले? सोन्या : बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता …. कॉपी केली म्हणून… मुख्याध्यापक जागेवर कोसळले
17.) मास्तर – असे कोणते बुक आहेत जे तुमच्या जीवनात महत्वाचे आहेत ? गण्या – सर मी सांगतो… मास्तर – हा सांग… गण्या – माज्या बापाच चेकबूक आणि तुमच्या मुलीचफेसबुक… – मास्तरनी गण्याला उलट टांगुण मारलय…
18.) एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता. ज्योतिषी : बेटा , तू खूप खूप शिकणार आहेस.. विद्यार्थी : ते माहितीय हो…गेल्या ८ वर्षांपासून मी शिकतोच आहे. मला सांगा , पण मी पास कधी होणार आहे ?
19.) माझे सगळे फ्रेंड्स खूप चांगले आहेत… पण मला हे कळत नाहि की ते पहिल्यापासुनच चांगले होते की माझ्या संगतीत राहुन चांगले झाले…

20.)चप्पल उलटी ठेवल्याने जर घरात भांडणे होत असतील … तर… पहिल्या अन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस… नक्कीच चपलेचा ट्रक उलटा पडला असेल…
21.) मित्रः भावा तू आता कुठे आहेस ????? भाऊः me USA madhe ahe. मित्रः भावा कधी गेला मला सांगितले नाही ???? भाऊः मी ऊसा मध्ये आहे, पाणी सोडतोय च्यामारी त्यासाठी सांगतो ना , मराठीत टायपिंग करा
22.) शिक्षक : रामू आणि शामू तुमच्या दोघांच्या प्रश्नांची उत्तरे सारखी कशी? रामू आणि शामू : प्रश्न पण सारखेच आहेत ना…
23.) एके दिवशी, आई दुपारी परदेशात राहणाऱ्या तिच्या मुलाला फोन करते. आई: “कसा आहेस बेटा?” मुलगा: “मी ठीक आहे, आई” आई: “जेवण झालं का? काय जेवलास?” मुलगा: “आई, तुझ्याकडे विचारण्यासाठी दुसरे काही नाही का? तू नेहमी फक्त वायफळ प्रश्न विचारतेस, ‘तू काय खाल्लेस?’ … ‘तू कोणाला भेटलास.’ …. ‘तू कोणते गाणे ऐकलेस?’ …” आई: “अरे!!!! ठीक आहे, ठीक आहे, तर मला सांग, चलन बाजारात कमीत कमी हस्तक्षेप करून जागतिक बँकेने या महागाईच्या प्रवृत्तींशी कसे लढावे? आणि जगभरात पसरणाऱ्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मंदावणाऱ्या महागाईच्या प्रवृत्तीला नियंत्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची भूमिका काय असावी?” मुलगा: (काही सेकंदांच्या शांततेनंतर)… “आई, मी लोणचं आणि कोशिंबीरीबरोबर दही भात खाल्ला.” नमोस्तुते!
24.) मुलाकडचे : मुली, तुला काही विचारायचं असेल तर विचार. लाजू नकोस! मुलगी : जर तुम्ही हे समोसे खाणार नसाल, तर मी खाऊ का?
25.) आमच्या घरी वरचेवर नातेवाईक यायचे…. मग पुण्याच्या मावशीने मला मल्टिलेव्हल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करायला सांगितले. आता दोन वर्षे झाली, आमच्याकडे एकही नातेवाईक फिरकलेला नाही…!
26.) नवरा म्हणजे Split AC सारखा असतो – बाहेर कितीही मोठ्या आवाजात बोलत असला तरी, घरात मात्र शांतच असतो!
27.) निवृत्त मित्रालाः तू दुपारी काय करतोस ? निवृत्त मित्रः घरातली कामं संपली की लेखनकार्यात गुंतवून घेतो स्वतःला. निवृत्त मित्रालाः काय लिहितोस ? निवृत्त मित्रः नाईस पिक, नाईस डीपी, ब्युटिफुल, गॉर्जस, वॉव, हॅपी बर्थ डे, अभिनंदन, विवाह दिवसाच्या शुभेच्छा, भावपूर्ण श्रद्धांजली आणि असं बरंच काही…
28.) लग्नाच्या वेळी बहुतांश नवरे मुलीच्या पालकांना सांगतात, “मी तुमच्या मुलीला आयुष्यभर आनंदी ठेवीन.” कधी ऐकलंय का की मुलगी नवऱ्याच्या पालकांना असं म्हणते – “मी तुमच्या मुलाला आयुष्यभर आनंदी ठेवीन.” नाही ना…? कारण स्त्रिया खोटं बोलत नाहीत!
29.) बायकांचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम….. सून झाल्यावर सासू चांगली मिळत नाही अन् सासु झाली तर सून चांगली मिळत नाही….. नणंद झाली तर भावजय चांगली भेटत नाही आणि वहीनी झाली तर नणंद चांगली निघत नाही…….. आता राहता राहिला नवरा……. अजूनपर्यंत तो तरी कुठल्या बाईला चांगला भेटलाय……..??
30.) एप्रिल कसा तरी सहन केला होता… मे महिना सहन होणार नाही म्हणून AC बसवून घेतला… आणि मे मध्येच पावसाळा चालू झाला… AC घेतला तेव्हा साडेचारशे रुपये परत ( कॅशबॅक ) मिळाले होते… त्यातूनच आता छत्री आणि रेनकोट येते का, ते पाहतो…

31.) जन्या : काय झालं? एवढा खूश का आहेस? मन्या : आज पहिल्यांदा बसमध्ये माझ्याशी एक मुलगी बोलली. जन्या : व्वा! मस्त! काय बोलली? मन्या : मी बसलो होतो… ती म्हणाली उठ ही लेडीज सीट आहे.
32.) हल्ली काही मुली लग्न झाल्यावर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावतात. त्यामुळे आधीच मजेदार असलेली आपली मराठी आडनावं अजूनच “Interesting” होतात. याची काही उदाहरणं: काळे-फडके, ओक-लेले, पोळ-लेले, पांढरे-फाटक, चिकटे-शेवाळे, चकणे-डोळे, कडू-श्रीखंडे, शेंडे-टकले, खोटे-पेशवे, कर्वे-बर्वे, मराठे-कानडे, खरे-खोटे आणि सगळ्यात भारी ‘पिसाळ-लेले’
33.) मित्र म्हणाला: चल तुला चुलीवरचा फळाचा ज्यूस पाजतो,.. मी म्हणालो, तूच पी गाढवा, आमच्याकडे त्याला हातभट्टीची दारू म्हणतात
34.) कोणी मला सांगेल का? कोंबडी तर शाकाहारी असते ना?? मग कोंबडी खाल्याने माणूस मांसाहारी कसा बनतो ??
35.) मी काय म्हणतो, आता युद्धविराम लागलेलाच आहे तर आपल्या शेतकऱ्यांना बॉर्डरवर शेती देऊन टाका ते बरोबर धुरा उकरत उकरत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा करतात की नाही बघा..!!
36.) सीजफायर म्हणजे काय? नवरा बायको चे कडाक्याचे भांडण सुरु असताना अचानक जर पाहुणे घरी आले की नवरा बायको मध्ये जो संवाद साधला जातो त्याला सीजफायर असे म्हणतात.
37.) बरे झाले सोशल मीडिया यायच्या आधी आमची दहावी बारावी निघून गेली नाहीतर मार्कशीट ऑनलाईन पोस्ट केल्यावर सगळी इज्जत निघाली असती
38.) प्राण्यांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंम्मत असते, केसपेपरवर नांव मालकाचे लिहितात आणि आजार प्राण्याचा लिहितात, उदा. नाव – अनिल पटवर्धन आजार – शेपटीला सूज आहे.
39.) वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो… इतक्यात आईचे लक्ष जाते. त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते, ‘किती वेळा सांगितले….आधी…. फोटो काढून Whatsapp वर टाकायचा आणि नंतरच खायचे’
41.) टच स्क्रिन ची संकल्पना भारतात सर्वप्रथम कुणी मांडली ? . . . . दादा कोंडके यांनी 1978 मध्ये . . . . बोट लावीन तिथं गुदगुल्या………..
42.) जन्या : मित्रा! तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो. तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय आहे? मन्या : माझी बायको मला चप्पल फेकून मारते. लागली तर ती हसते आणि नाही लागली तर मी हसतो. देवाच्या कृपेने जीवन हसतखेळत चाललं आहे.
Marathi jokes
- #GujaratiComedy #FunnyJokesGujarati #GujjuReels #GujaratiMasti #HasyaJokes #PatniPatiJokes #GarbaJokes #GujaratiChutkula #GujaratiLaugh #GujjuJokes #MojNiLife #GujaratiFunnyVideo
- funny jokes
- gujarati funny jokes
- gujarati joke
- gujarati jokes
- gujarati kahani
- gujarati ma kahani
- gujarati motivation
- gujarati quotes
- Gujarati Story
- Gujarati Suvichar
- Gujarati varta
- gujju jokes
- gujju kahani
- Gujju Story
- GUJJU VARTA
- hindi quotes
- hindi story
- hindi suvichar
- joke in gujarati
- jokes in gujarati
- jokes in marathi
- marathi joke
- marathi jokes
- marathi tadka
- mata pita ki kahani
- motivation hindi
- motivation in gujarati
- motivational story
- SAD STORY
- Suvichar in Gujarati
- text of kahani gujju
- हिंदी कहानी
-
Top 100 Gujarati Comedy Jokes | ગુજરાતી કોમેડી જોક્સ !
અહીં તમારા માટે ખાસ 100 Gujarati Comedy Jokes અને ફની જોક્સ તૈયાર કર્યા છે. (Gujarati Comedy Jokes) 🤣 તમને હસાવવાનું કામ આજે અમે લઈ લીધું છે! Gujarati Comedy Jokesઆજના ખાસ…
-
100+ શ્રેષ્ઠ ગુજરાતી સુવિચારો (Gujarati Suvichar)
સુવિચાર(Suvichar) એટલે ગુજરાતી સુવિચાર એ એવો વિચાર અથવા મંત્ર છે જે માનવને સમજવા અને પ્રેરણા આપવામાં આવે છે. તે માનવને જીવનમાં શક્તિ, સહનશીલતા, પ્રેમ, સમાધાન અને આનંદનો અનુભવ કરવાની સ્ફૂર્તિ આપે છે. સુવિચારો માનવની ભાવનાઓ…
-
Gujarati Funny Jokes | 45+ ગુજરાતી રમુજી જોક્સ 2025
કેમ છો મિત્રો મજા મા ને આજે તમારાં માટે Gujarati Funny Jokes નો ખજાનો લઈને આવ્યો છું જે વાંચી વાંચીને તમે લોટ પોટ થઈ જશો કેમકે આ જોક્સ એટલાં કોમેડી છે કે…
-
ગુજરાતી સુવિચાર – Inspiring Gujarati Suvichar
સુવિચાર(Suvichar) એટલે ગુજરાતી સુવિચાર એ એવો વિચાર અથવા મંત્ર છે જે માનવને સમજવા અને પ્રેરણા આપવામાં આવે છે. તે માનવને જીવનમાં શક્તિ, સહનશીલતા, પ્રેમ, સમાધાન અને આનંદનો અનુભવ કરવાની સ્ફૂર્તિ આપે…
-
Marathi Jokes | 40+ भन्नाट मराठी जोक ? Latest 2025
Marathi jokes : नमस्कार मित्रांनो, विनोद म्हणजे माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला आहे. marathi jokes करून एखाद्याला खळखळून हसवण हे प्रत्येकालाच जमत नाही.तर असेच काही marathi jokes इथे तुम्हाला पहायला मिळतील. मित्र…
-
Gujarati Jokes | 15+ જોક્સ વાંચીને થશો હસી-હસીને પાગલ!!!
કેમ છો મિત્રો મજા માને આજે તમારાં માટે Gujarati Jokes નો ખજાનો લઈને આવ્યો છું જે વાંચી વાંચીને તમે લોટ પોટ થઈ જશો કેમકે આ જોક્સ એટલાં કોમેડી છે કે…